कणकवली शहरातील शाळा क्रमांक ३ ची जमीन : गटनेते सुशांत नाईक यांची माहिती
*💫कणकवली दि.३१-:* कणकवली शहरातील शाळा क्रमांक ३ जमीन भालचंद्र महाराज संस्थानाला हस्तांतरित करण्याबाबत १ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे, अशी माहिती गटनेते सुशांत नाईक यांनी दिली. या संदर्भात आमदार वैभव नाईक व शिवसेना नेते संदेश पारकर यांनी नुकतेच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले होते. नगर विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत नुकतीच बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीतील सूचनांचा अंमलबजावणीचा भाग म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी आमदार वैभव नाईक, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, कणकवली तहसीलदार आर. जे पवार, मुख्याधिकारी वैभव साबळे आदी उपस्थित राहणार आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी या बैठकीबाबत संबंधितांना सूचना दिल्याची मा
