जिल्ह्यात नवीन ८४ कोरोना रुग्ण…

आणखी एकाचा मृत्यु:सक्रीय रुग्णसंख्या ४३४ वर

*💫सिंधूदुर्गनगरी दि ३१-:* जिल्ह्यात आज तब्बल ८४ कोरोनाचे रुग्ण मिळाले आहेत. यामुळे एकूण बाधित संख्या ७ हजार १२२ झाली आहे. आणखी एका रुग्णाचे निधन झाले आहे. देवगड तालुक्यातील ८० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. यामुळे जिल्ह्यातील कोरोना मृत्यु संख्या १८३ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सक्रीय संख्या ४३४ झाली आहे.

You cannot copy content of this page