झाराप गावामध्ये कृषीदुतांचे आगमन…

शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन..

⚡कुडाळ ता.१४-: उद्यानविद्या महाविद्यालय,मुळदे येथील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम-२०२४ अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांच्या समस्या व इतर बाबींचा अभ्यास करण्याकरिता झाराप गावामध्ये या कृषीदुतांचे आगमन झाले आहे. शेतीतीलआधुनिक तंत्रज्ञान या विषयी ते मार्गदर्शन करणार आहेत.


हे विद्यार्थी जून ते नोव्हेंबर या कालावधीत गावामध्ये राहून शेतीविषयक माहिती घेणार आहेत .गावात राहून गावाची शेतीविषयक कार्यपद्धती ,विविध संस्था – शाळा, शेतीवर आधारित विविध उद्योग यांची सविस्तर माहिती घेणार आहेत. प्रगतशील शेतकरी महाराष्ट्र राज्य वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार सन्मानित शरद धुरी यांचे त्याना विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. विविध शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतीविषयक ज्ञानाची देवाणघेवाण करणार आहेत. सदर गटामध्ये मुणाल चौधरी, आदित्य सावंत, उत्कर्ष लोखंडे, सिद्धेश शिखरे, सुदेश रेवंडकर, विक्रम सिंह या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

You cannot copy content of this page