गौड सारस्वत ब्राम्हण समाज वेंगुर्लातर्फे तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा २३ रोजी सत्कार…

⚡वेंगुर्ले ता.१४-: वेंगुर्ले तालुक्यातील गौड सारस्वत ब्राम्हण समाजातील दहावी, बारावी, पदविका, पदवी प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवार दि. २३ जून रोजी सकाळी १० वाजता स्वामिनी मंगल कार्यालय वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आलेला आहे.


या विद्यार्थ्याच्या गुण गौरव व सत्कार समारंभामध्ये इयत्ता दहावी, बारावी, पदविका आणि पदवी आदी परीक्षांमध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेले आहेत. त्या सर्व विद्यार्थीचा सत्कार केला जाणार आहे. त्यामुळे इयत्ता दहावी, बारावी, पदविका आणि पदवी आदी परीक्षांमध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेले आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपली नावे दि. २१ जून पर्यत सुजाता पडवळ-९४२१२६८२३९ यांच्याकडे किंवा संजय पुनाळेकर यांच्याकडे द्यावीत.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमांस ज्ञातीतील सर्व समाजबांधव व भगिनीनी तसेच गुणवंत विद्यार्थांच्या पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन गौड सारस्वत ब्राम्हण समाज, उपसमितीच्या अध्यक्षा सौ. सुजाता पडवळ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page