विनायक राऊत शुक्रवारी दोडामार्ग दौऱ्यावर…

⚡दोडामार्ग ता.१३-: माजी खासदार तथा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व सचिव विनायक राऊत उद्या (ता.१४) दोडामार्ग दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश दळवी यांच्या तहसील समोरील संकुलातील सभागृहात ते पदाधिकारी व कार्यकत्यांशी संवाद साधणार आहेत.

यावेळी शिवसेनेचे लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संजय पडते,संपर्क प्रमुख शैलेश परब, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रवीण भोसले, सुरेश दळवी, अमित सामंत, इर्शाद शेख, विकास सावंत, राष्ट्रवादी महिला कोकण अध्यक्ष अर्चना घारे – परब आदी महाविकास आघाडी चे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.तरी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या बेसिक, महिला व युवा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे. असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय गवस, उपजिल्हा प्रमुख बाबूराव धुरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर,उपजिल्हा प्रमुख संदीप गवस, काँगेस तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक आदींनी केले आहे.

You cannot copy content of this page