जामसंडे येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡देवगड ता.१२-: देवगड तालुका गुजराती नवरात्र मंडळ आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमानाने जामसंडे हायस्कूल येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन कांतीभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले असून रक्तदान शिबिराला उस्फुर्त असा प्रतिसाद ५५ रक्तदात्यांनी केले.

यावेळी सिंधू रक्त मित्र मंडळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष हिराचंद तानवडे,सचिव प्रकाश जाधव,विजयकुमार जोशी,रविकांत चांदोस्कर,प्रवीण जोग तसेच हरिभाई पटेल,हिरालाल पटेल,रमनभाई पटेल,मोहनभाई पटेल,लहेरीकांत पटेल,युवक अध्यक्ष भावेश पटेल,सचिव वसंत पटेल,हेल्थ डिपार्टमेंट जिगर पटेल तसेच यावेळी डॉ. मोहन बिडगर,श्रीमती प्रांजली परब,श्रीमती,रुबिना शरीक मसलत,श्रीमती नेहा परब,श्री नंदकुमार आडकर,श्री सुरेश डोंगरे,श्री नितिन गावकर आदींचे सहकार्य लाभले यावेळी गुजराती युवक बांधवांचे देखील मोठे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page