विकास बडवे यांना पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती…

बांदा/प्रतिनिधी
बांदा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले विकास बडवे यांना पोलीस खात्याच्या वतीने जाहीर झालेल्या पदोन्नतीत पोलीस निरीक्षक पदाचा दर्जा मिळाला आहे. त्यांचे याबाबत अभिनंदन होत आहे.
श्री बडवे हे २०११ च्या पोलीस उपनिरीक्षक भरतीत पोलीस खात्यात भरती झाले होते. उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर २०११ मध्ये ते गडचिरोली येथे रुजू झाले होते. नक्षली भागात काम केल्यानंतर ते सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून २०१४ मध्ये पुणे येथे रुजू झालेत. त्यानंतर पुणे, सातारा, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी काम केल्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुजू झालेत.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी बांदा पोलीस ठाण्यात पदभार स्वीकारला. त्यांची पोलीस निरीक्षक पदी बढती झाल्याने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
फोटो :-
विकास बडवे.

You cannot copy content of this page