ओरोस ता १२-:वैभववाडी पोलीस ठाण्याचे हवालदार शैलेंद्र दिनकर कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून व मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वैभववाडी पोलीसांच्या कोठडीत असलेल्या तिथवली गावातील संतोष रामचंद्र हरयाण, आत्माराम रामचंद्र हरयाण यांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
वैभववाडी पोलीसांनी या चौघांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट व सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून ओरोस येथील विशेष सत्र न्यायालयात हजर केले. परंतु सरकार पक्षाने पोलीस कस्टडी वाढण्याची केलेली मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावत सावंतवाडी येथील कारागृहात रवानगी केली. आरोपींच्या वतीने दाखल जामीन अजीवर १७ मे २०१४ रोजी यातील प्रकाश आत्माराम हरयाण व दिलीप रामचंद्र हरयान यांना अटी-शर्तीवर जामीन मंजूर झाला होता. उर्वरित आरोपी, संतोष रामचंद्र हरयाण व आत्माराम रामचंद्र हरयाण यांच्या वतीने दाखल दुसया जामीन अर्जावर विशेष सत्र न्यायाधीश यांनी ११ जून २०२४ रोजी आदेश करून त्यांचाही सशर्त जामीन मंजूर केला. आरोपींच्या वतीने अॅड. संतोष दळवी यांनी केलेल्या युक्तीवादाचे आधारे आरोपातील संदिग्धता लक्षात घेता या कामी पोलीसांतर्फे व सरकारी पक्षातर्फे मागणी केलेली पोलीस कस्टडी न्यायालयातर्फे फेटाळण्यात आला. आरोपींचा जामीन अर्ज मंजूर होणेकामी अॅड. संतोष दळवी यांना अॅड. कृष्णा चव्हाण, अॅड भरत व गौतमी गावकर, अँड सुमीत पाटकर यांनी सहकार्य केले.
