बांदा/प्रतिनिधी
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग’चे मुख्य प्रवर्तक तथा जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांची मुलाखत १४ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता आकाशवाणी सिंधुदुर्गवर प्रसारित होणार आहे. १४ जून हा जागतिक रक्तदान दिन असून याचे औचित्य साधून ‘रक्तदानाचे महत्त्व व रक्तदान चळवळ’ हा या मुलाखतीचा विषय आहे. ही मुलाखत ‘न्यूज ऑन एअर’ या अॅपवरुनही ऐकता येणार आहे. ही मुलाखत श्रीपाद कोहाळेकर यांनी घेतली आहे. श्री तेंडोलकर यांच्या या मुलाखतीत रक्तदानाचे महत्त्व, जिल्ह्यातील रक्तदान चळवळ, रक्तदाते यांचे योगदान, रक्तपेढीची यंत्रणा, रक्तपेढ्यांचे सहकार्य आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली आहे. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचा उद्देश व जिल्ह्यातील कार्य याचाही आढावा घेतला आहे. या माध्यमातून नवनवीन रक्तदात्यांनी चळवळीत सहभाग घ्यावा, असे आवाहन तेंडोलकर यांनी केले आहे.
फोटो :-
प्रकाश तेंडोलकर.
प्रकाश तेंडोलकर यांची १४ रोजी आकाशवाणीवर मुलाखत…
