बांदा येथे पाकिस्तानचा ध्वज जाळला…

वैष्णोदेवी दहशदवादी हल्ल्याचा हिंदू बांधवांनी केला निषेध

बांदा/प्रतिनिधी
वैष्णोदेवीचे (काश्मीर) येथे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या बसवर दहशदवाद्यानी भ्याड हल्ला केल्याने या घटनेत कित्येक हिंदू भाविकांचा मृत्यू झाला. याच्या निषेधार्थ बांदा येथे हिंदू भावनांनी एकत्र येत पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळला, तसेच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.


येथील कट्टा कॉर्नर चौकात सर्वप्रथम मयत झालेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी निलेश सावंत-पटेकर, माजी सभापती शीतल राऊळ, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, आबा धारगळकर, हेमंत दाभोलकर, शैलेश केसरकर, दादू कविटकर, संदेश सावंत आदिसह हिंदू बांधव उपस्थित होते.

You cannot copy content of this page