नारायण राणेंच्या यशात महत्वाची भूभिका; कार्यकर्त्यांकडून कृतज्ञता व्यक्त…
⚡सावंतवाडी,ता.१२: खासदार नारायण राणे यांच्या विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार्या पालकमंत्री तथा राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा सावंतवाडी भाजपकडून सन्मान करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब व जिल्हा चिटणीस महेश सारंग यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी युवराज लखमराजे भोसले,अजय गोंदावळे, श्वेता कोरगावकर, मनोज नाईक, रवींद्र मडगावकर, विनोद सावंत,संजू शिरोडकर, प्रमोद कामत, महेश धुरी, मोहिनी मडगावकर, परीक्षीत मांजरेकर, दिलीप भालेकर,आदी उपस्थित होते
