नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर बांदा भाजप कडून जल्लोष….

⚡बांदा ता.०९-: नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर बांदा शहरात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसेच पेढे वाटून आनंद साजरा केला.
केंद्रात भाजप महायुतीचे सरकार स्थापन झाले असून नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. बांदा येथील चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ‘नरेंद्र मोदी आगे बढो’च्या घोषणा दिल्यात.
यावेळी सरपंच प्रियांका नाईक, भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, तालुका सरचिटणीस दादू कविटकर, माजी जिल्हाध्यक्ष शामकांत काणेकर, माजी सभापती शीतल राऊळ, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, शामसुंदर मांजरेकर, रुपाली शिरसाट, देवल येडवे, बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, गुरुनाथ सावंत, गुरु कल्याणकर, सिद्धेश महाजन, निलेश कदम, शैलेश केसरकर, सुनील धामापूरकर, साहिल कल्याणकर आदिसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page