दत्तात्रय मारकड यांचे प्रतिपादन ः तोंडवली येथे स्वसंरक्षण व संस्कार वर्गाचा शुभारंभ..
⚡कणकवली ता.०९-: मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आणि आधुनिक युगात आत्मसंरक्षण करण्यासाठी ज्युदो-कराटे व तायक्वांदो सारखी एखादी तरी कला आत्मसात करणे गरजेचे आहे. निरोगी आरोग्यसाठी, स्वयंशिस्तीसाठी आणि आत्मविश्वास जागृत करण्यासाठी प्रत्येकाने मार्शल आर्टची कला आत्मसात करायलाच हवी, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो व कराटे असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड यांनी व्यक्त केले. तोंडवली ग्रामस्थांच्यावतीने बोभाटेवाडी हनुमान मंदिर येथे कराटे स्वसंरक्षण आणि संस्कार वर्गाचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी एकनाथ धनवटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी श्री. मारकड बोलत होते. यावेळी पोलीस पाटील विजय मोरये, यशवंत सदडेकर, संजय पाताडे, शशांक तळेकर, नीलेश तळेकर, वैशाली सदडेकर, साक्षी नाडकर्णी, तन्वी मेस्त्री, मयुरी बोभाटे, तुकाराम मोरये, दिगंबर साळुके, अंबरनाथ सांळुके, विजय मोरये, बाळा बोभाटे, मधुकर बोभाटे, मयुरी बोभाटे, सानिका बोभाटे, ज्योती भाट, मानसी बोभाटे, मंगला मोरये, सिद्धी सांळुके, तन्वी मेस्त्री, गीता सांळुके, सुंनदा सांळुके, श्वेता साळसकर, सरिता साळसकर, दीपाली शिरसाट, सुरेखा बोभाटे आदी उपस्थित होते.
एकनाथ धनवटे म्हणाले, मार्शल आर्टच्या प्रशिक्षणातून मुला-मुलींना मानसिक, बौद्धिक, शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले जाते. हा प्रशिक्षणवर्ग प्रत्येक शनिवार आणि रविवारी सुरू राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. सुषमा सावंत यांनी मुला-मुलींना या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्योती भाट यांनी केले. यावेळी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
