बांदा-दाणोली मार्गावर कॅन्टर व चेस डंपर यांच्यात भीषण अपघात…

माल वाहक ट्रकचा चालक किरकोळ जखमी:दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान…

⚡बांदा ता.०८-:बांदा-दाणोली मार्गावर वाफोली डोंगरीकर हॉटेल जवळ कॅन्टर व चेस (डंपर) यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. धडकेत दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये माल वाहक ट्रकचा चालक किरकोळ जखमी झाला. त्याला बांदा प्राथमिक उपकेद्रांत उपचार करुन घरी पाठविण्यात आल्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी सांगितले. हा अपघात शनिवारी पहाटे झाला. याबाबत सायंकाळी उशिरा बांदा पोलिसांत अपघातीची नोंद करण्याची प्रकिया सुरु होती.
या मार्गावर दोन्ही बाजूस झाडेझुडपे वाढलेली आहेत. वळणावर समोरुन येणारे वाहन चालकाला दिसत नाही. सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. हा अपघात पुर्णत: बांधकाम विभागाच्या बेजबाबदारपणामुळे घडला असल्याचा आरोप विलवडे सरपंच प्रकाश दळवी यांनी केला आहे.
     बांदा दाणोली मार्गावर अपघाताचे सत्र सुरुच आहे. काही ठिकाणी रस्ता अरुंद व वळणावळणाचा आहे. दाणोली, सातोळी-बाळवाट, सरमळे, विलवडे, वाफोली, बांदा ही गावे येतात. कोल्हापुर, पुणे, बेळगाव, गोव्यात जाणारे पर्यटक याच मार्गाचा वापर करतात. या मार्गावर उतार व वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने बरेच अपघात झाले आहेत. या मार्गावर दिशादर्शक व वेग मर्यादा फलक लावणे गरजेचे आहे. काही ठिकाणी रस्ता अरुंद व वळणावळणाचा आहे. संबधित विभागाने रस्त्याचा सर्वे करणे गरजेचे आहे. यापुढे जिवितहानी, नुकसान झाल्यास संबधित विभाग जबाबदार राहील. संबधित विभागाने गणेश चतुर्थी पुर्वी दखल न घेतल्यास माजी पंचायत समिती सदस्य संदिप गावडे यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी बांधकाम विभाग कार्यालयत धडक देणार असा ईशारा विलवडे सरपंच प्रकाश दळवी यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page