⚡मालवण ता.०१-: शिवसेना युवासेना मालवण तालुका व युवासेना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने तसेच शिवसेना नेते किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण मधील दहावी परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांचा व पालकांचा गौरव केला.
यामध्ये मालवण तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या कैवल्य सागर मिसाळ – कुंभारमाठ (९९.४० टक्के, टोपीवाला हायस्कूल) याच्यासह आर्य कुलकर्णी – मालवण (९७.२०टक्के, जय गणेश इंग्लिश स्कुल), सम्राट राजे – मालवण (९६.२० टक्के, भंडारी हायस्कूल), ओम विश्वास गांवकर – मालवण (८१ टक्के, जय गणेश इंग्लिश स्कुल) या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना युवासेना मालवण तालुका – सिंधुदुर्ग जिल्हा तर्फे कॉलेज उपयुक्त भेटवस्तू, गुलाब पुष्प-रोपे देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवासेना जिल्हा प्रमुख ऋत्विक सामंत, युवती सेना जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, युवासेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर, युवती सेना मालवण तालुका प्रमुख मधुरा तुळसकर यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
