⚡सावंतवाडी ता.३०-: माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी सावंतवाडी शहर मर्यादित सर्व हायस्कूल मधील पहिले तीन क्रमांक मिळालेल्या दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार केला जातो. याही वर्षी दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा दिनांक 31 मे रोजी सकाळी दहा वाजता राजा शिवाजी चौक (आंबोली रोड) वैश्य भवन हॉलमध्ये आयोजित केला आहे.
तरी गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी 31 मे रोजी सकाळी ठीक दहा वाजता वैश्य भवन हॉलमध्ये उपस्थित राहायचे आहे. असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी रवी जाधव 9405264027 व दीपक सावंत 7249202691 यांच्याशी संपर्क साधण्याचा आव्हान देखील केले आहे.
