स्नेह मेळावाव्यातून झाडे लावा झाडे जगवा चा दिला संदेश.
⚡सावंतवाडी ता.३०-: आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूलच्या सन १९९१-९२ मधील दहावी बॅचचा स्नेहमेळावा काल बुधवारी विद्याविहार इंग्लिश स्कूल मध्ये उत्साहात पार पडला.
दरवर्षी आम्ही वर्गमित्रच्या वतीने स्नेहमेळावा घेण्यात येतो. या मेळाव्यातून अनेक वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. ह्याही वर्षी असाच सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे. या विद्यालयातील दहावी व शिरोडा केंद्रातून बारावी मध्ये प्रथम आलेल्या तसेच आम्ही वर्गमित्र गृपवरील सदस्यांच्या मुलांचा यावेळी शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प तसेच एक चाफा कलम देऊन सत्कार करण्यात आला. यात तिरोडा ची सुकन्या कु निशिता सुरेंद्र खासे भोसले, सानिका जितेंद्र मोरजकर, कु.जान्हवी सुनील मुळीक, तेजल गावडे, अदिती राजाध्यक्ष, मयुरी महेश आरोसकर, निकिता महादेव कापडी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना आम्ही वर्गमित्र च्या सदस्या मनीषा गोवेकर यांनी केली. यावेळी त्यांनी विद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या गृपमार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात तसेच ह्याही पुढेही असेच विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी दहावी, बारावी मधील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांत उपस्थित सदस्यांनी आपापले मनोगत व्यक्त करून उपस्थित विद्यार्थ्याचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. ग्रुप च्या सदस्या मनीषा गोवेकर यांनी यावेळी उपस्थित सर्व सदस्यांना स्वखर्चाने भेट वस्तू दिल्या. तसेच तसेच आम्ही वर्गमित्र कडून विद्यालयास छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असलेली प्रतिमा देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनीषा गोवेकर, दिनानाथ काळोजी, राजेश आजगावकर, रुपेश पालयेकर यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा गोवेकर तर आभार प्रदर्शन दिनानाथ काळोजी यांनी केले. कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रुप च्या वतीने विद्यालयाचे आभार मानण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी, सत्कारमूर्ती विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
