⚡वैभववाडी ता.२९-: कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असून या पार्श्वभूमीवर वैभववाडी भाजपा कार्यालयात पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे आदी उपस्थित होते.
यावेळी वैभववाडी भाजपाच्या वतीने आमदार निरंजन डावखरे, श्री. काळसेकर, व श्री. सावंत यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी व प्रमोद रावराणे यांनी मागील निवडणुकीत तालुक्याची मतदार संख्या व या निवडणुकीत असलेली मतदार संख्या याबाबत माहिती दिली. अतुल काळसेकर व आ. निरंजन डावखरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. निवडणुकीचे योग्य नियोजन करा, मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी नियोजन असले पाहिजे. जास्तीत जास्त मतदान सकाळच्या सत्रात झाले पाहिजे. असे सांगत मार्गदर्शन केले. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, नगराध्यक्षा नेहा माईणकर, माजी सभापती अरविंद रावराणे, भाजपा जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे, सज्जन काका रावराणे, जिल्हा बँक माजी संचालक गुलाबराव चव्हाण, प्राची तावडे, सीमा नानिवडेकर व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन नगरसेवक डॉ. राजेंद्र पाताडे यांनी केले.
कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न…
