⚡कणकवली ता.२७-: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाला. या निकालात सलग 13 वर्षी कोकण विभागाने पहिला क्रमांक राखला अाहे. कोकण विभागाचा दहावीचा निकाल 99.01 टक्के लागला अाहे.
राज्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करुन कोकण विभागाने निखळ यश प्राप्त केले. याबद्दल कोकणातील सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन मी करतो. मागील 13 वर्षे कोकणातील विद्यार्थ्यांनी सातत्याने महाराष्ट्रामध्ये कोकणाचे पहिले स्थान राखले आहे. कोकणातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल मी त्यांचे, त्यांच्या शाळांचे व शिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीमध्ये सुध्दा असेच उत्कृष्ट यश त्यांनी प्राप्त करावे अशा शुभेच्छा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी दिल्या.
