केरवाडी भगतवाडी येथे घरात आढळला पुरुषाचा मृतदेह…

वेंगुर्ले प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा केरवाडी भगतवाडी येथील दया भगत वय ३८ यांचा मृतदेह
आज सोमवारी सकाळी राहत्या घरात आढळून आला. शिरोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढून रेडी येथे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
भगतवाडी येथे दया भगत आपल्या वडिलांसोबत राहत होता. त्याची पत्नी कामानिमित्त मुंबईला होती. आज सकाळी बाजूच्या ग्रामस्थांनी त्याच्या घरात त्याला हाक दिली असता घरातून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या बाबत पोलिसांना कळवले. नंतर घरात आत प्रवेश करून पाहिले असता दया मृतावस्तेत आढलून आले. पोलीस भिसे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

You cannot copy content of this page