असलदे सोसासटीच्या बैठकीत कर्ज विषयावर चर्चा…

बैठकीनंतर खत विक्रीचा शुभारंभ..

⚡कणकवली ता.२५-: असलदे रामेश्‍वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी बैठक पार पडली. यात कर्ज विषयावर चर्चा झाली. सोसायटीचे कर्ज उचल शेतकर्‍यांचा सातबारा व अन्य कागदपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोसायटीच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली.


सदर बैठक चेअरमन भगवान लोके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्हाईस चेअरमन दयानंद हडकर, उपसरपंच सचिन परब, माजी चेअरमन प्रकाश परब, सोसायटी संचालक शतुघ्न डामरे, परशुराम परब, श्यामराव परब, विठ्ठल खरात, माजी तंटामुक्त अध्यक्ष बाबाजी शिंदे, विनायक परब, दिनेश शिंदे, प्रवीण डगरे, उत्तम नरे, रघुनाथ लोके, भालचंद्र लोके, मधुसुदन परब, सचिन हरमलकर, मनोज लोके, प्रवीण डामरे, संतोष घाडी, तुषार घाडी, विजय डामरे, अनिल लोके, प्रकाश डामरे, गणेश डामरे, एकनाथ डामरे, सत्यवान लोके, संतोष डामरे, रामचंद्र डामरे, सदाशिव डामरे, भास्कर मालवणकर, प्रशांत लोके, वासुदेव दळवी, विजय परब, गुरुनाथ हडकर, भरत डामरे, जयवंत लोके, बाबू वाळके, सत्यवान घाडी, सोसायटी सचिव अजय गोसावी, लिपिक गौरी लोके आदी उपस्थित होते.
अंकुश डामरे यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन सोसायटीची वाटचाल सुरु असल्याचे भगवान लोके यांनी सांगितले. आरंभी सोसायटीचे माजी चेअरमन अंकुश डामरे, संचालक अनंत तांबे यांचे निधन झाल्याबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
बैठकीतनंतर खत विक्री शुभारंभ सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर शेतकर्‍यांना सेंद्रिय खते, सुफला, विविध प्रकारची खते देण्यात आली.

You cannot copy content of this page