अन्यथा कार्यालयात झोपून करणार आंदोलन…

काका परब यांचा इशारा ः पाडलोसमध्ये चौथ्या दिवशीही वीजपुरवठा ठप्प..

⚡बांदा ता.२५-: वादळी पावसात पाडलोसमध्ये मोठे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान वीज वितरणचे झाले. परंतु वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणेस चौथा दिवस उजाडतो हे वीज वितरणचे अपयश आहे. नैसर्गिक आपत्तीवेळी अधिकार्‍यांचे फोन दोन दोन दिवस बंद असतात. त्यामुळे संपर्क करायचा तरी कुठे? काही अधिकारी उद्धट उत्तरे देतात. आज दि. 25 मे रोजी शनिवारी रात्री 9 वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास 9.30 वा. सावंतवाडी वीज कार्यालयात सर्व वीज ग्राहक व ग्रामस्थांना घेत झोपून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा भाजप सावंतवाडी युवामोर्चा सरचिटणीस तथा पाडलोस ग्रा.पं.सदस्य काका परब यांनी दिला आहे.


पाडलोस भागात काही ठिकाणी सोडल्यास वीजपुरवठा ठप्प झालेला आहे. वाढत्या उष्म्यामुळे लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांना वीज नसल्याने बाहेर झोपावे लागत आहे. काही आजारी नागरिक अस्वस्थ होत आहेत. अधिकाऱ्यांनी यापूर्वी कामात तत्परता दाखविली असती तर आज वीज पुरवठा सुरळीत करण्यास चौथा दिवस उजाडला नसता. आज रात्री 9 वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आजच रात्री 9.30 वाजता सावंतवाडी वीज कार्यालयात झोपून आंदोलन करणार असल्याचा इशारा काका परब यांनी दिला आहे.
दरम्यान, वीज अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

You cannot copy content of this page