⚡सावंतवाडी ता.२३-: वाफोली येथे श्री देवी माऊली पंचायतन कलशारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी उपस्थित राहून श्रीदेवी माऊली चे मनोभावे दर्शन घेत ग्रामस्थ, भाविक भक्तांशी संवाद साधला.
समवेत देवस्थान अध्यक्ष विलास गवस, वाफोली उपसरपंच विनेश गवस, देवस्थान प्रमुख हरी गवस, उपाध्यक्ष शिवाजी गवस, व्हा.चेअरमन अनिल गवस, तंटामुक्ती अध्यक्ष सतिश गवस, रंजन गवस, माजी ग्रामपंचायत सदस्य विनायक दळवी, शिवसेना तालुका उपाध्यक्ष बबन राणे, मनोहर गवस, अंकुश गवस, वाफोली वि.का.सेवा सोसायटी चेअरमन धनश्रीताई गवस आदी मान्यवर उपस्थित होते.
