कुणकेश्वर झाले हाऊसफुल…

रस्त्यातच गाड्या पार्किंग केल्याने झाले रस्ते ब्लॉक:वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष..

⚡देवगड ता.२३-: दक्षिण कोकणची काशी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर धार्मिक पर्यटन स्थळाकडे सध्या पर्यटकांचा कल जास्त आहे सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम असल्याने मुंबई गोवा तामिळनाडू कर्नाटक गुजरात सह इतर भागातले ही पर्यटक कुणकेश्वर मध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत.


श्री देव कुणकेश्वर महादेवाचे दर्शन झाल्यानंतर कुणकेश्वर समुद्रकिनारी मौज मजा करत निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत.फोटोसेशन करण्यात मग्न दिसत आहेत. काही ठिकाणी देवगड हापूसची चव चाखतानाही पर्यटक दिसत आहेत. मात्र आलेल्या पर्यटकांमुळे कुणकेश्वरचे पर्यटन
बहरलेले असल्याने येथील व्यवसायिक देखील तेजीत दिसत आहेत. सद्या देवगड तालुक्यात पर्यटकांचा कल वाढलेला दिसत. आहे त्यामुळे येथील हॉटेल लॉजिंग देखील फुल आहेत.
मात्र आलेल्या पर्यटकांनी आपल्या गाड्या रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केल्यामुळे या मार्गाने देवगडकडे किंवा मालवणकडे मार्गस्थ होणाऱ्या माणसांना मोठा अडथळा निर्माण होत आहेत. चुकीच्या पद्धतीने पार्किंग केल्यामुळे येथील वाहन चालकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पार्किंग व्यवस्था केली जात आहे मात्र त्यावर व्यवस्थित नियंत्रण नसल्याने कुणकेश्वर मध्ये
वाहतुकीचा खेळखंडोबा सातत्याने होताना दिसत आहे. पोलीस प्रशासनाने या ठिकाणी वाहतूक पोलीस किंवा हाँगर्डची नेमणूक करणे आवश्यक असताना देखील पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
सध्या पर्यटन हंगाम असल्याने गर्दीच्या ठिकाणी होमगार्ड किंवा ट्राफिक वाहतूक पोलीस तैनात करणे आवश्यक आहे. परंतु अपुऱ्या कर्मचारी वर्गाचे कारण पुढे करत ते टाळले जात आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीसच नसल्याने किरकोळ अपघाताचे प्रमाण देखील वाढलेले पहायला मिळत आहे.

You cannot copy content of this page