अँड परिमल नाईक; मुख्याधिकाऱ्यांकडे केली मागणी..
⚡सावंतवाडी ता.१८-:* शहरातील गटारांची साफसफाई तसेच रस्त्यांचे डागडुजी व जुनाट वृक्ष पावसाळापूर्वी करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक अँड परिमल नाईक यांनी सावंतवाडी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. दरम्यान शहरात अद्याप पर्यंत गटारांची साफसफाई पूर्ण झाली नसून पावसाळा नजदीक आला आहे त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी व नागरिकांना कोणत्याही त्रास होऊ नये याकरिता सर्व कामे तातडीने मार्गे लावावे अशी मागणी देखील श्री.नाईक यांनी यावेळी केली आहे.
