न्हावेली-रेवटेवाडीत 21 रोजी भवानी मातेचा गोंधळ…

⚡बांदा ता.१८-:
न्हावेली-रेवटेवाडी येथील श्री देवी भवानी मंदिरात मंगळवार दि. 21 मे रोजी भावानी मातेच्या गोंधळाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळपासून विविध धार्मिक विधी तर रात्रो 8 वा. सगुण भुते (आरोंदा) यांच्या हस्ते देवीच्या गोंधळाची मांडावळ, 9 वा. देवीचा महाप्रसाद, 10 वा. मालवण कट्टा ग्रुप यांच्या सुमधुर आवाजात गोंधळाच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी गोंधळाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page