⚡मालवण ता.१५-: अष्टपैलू कलानिकेतन, मालवण या संस्थेतर्फे स्व. नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मरणार्थ आयोजित जिल्हास्तरीय सवेश, साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत बाल गटात कनक काळोजी, कुमार गटात प्राजक्ता ठाकूरदेसाई व खुल्या गटात कौस्तुभ धुरी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात ही स्पर्धा संपन्न झाली. यावेळी विविध गटातील स्पर्धकांनी आकर्षक वेशभुषेत अभिनय साकारून नाट्यगीते सादर केली. त्यास उपस्थित रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळाली. स्पर्धेचे परीक्षण गोवा येथील संजय धूपकर व केशव पणशीकर यांनी केले. तर स्पर्धकांना संगीत साथ भालचंद्र केळूसकर व सुधीर गोसावी यांची लाभली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – बालगट – प्रथम – कनक काळोजी, द्वितीय – प्रांजल सतीश तेरसे, तृतीय – श्लोक निलेश सामंत, उत्तेजनार्थ – मृण्मयी सदाशिव आरोलकर, ज्ञानेश्वर तांडेल, आराध्य खोत. कुमार गट – प्रथम – प्राजक्ता अभय ठाकूरदेसाई, द्वितीय – आर्या आजगावकर, तृतीय – वेदिका परशुराम लुडबे, उत्तेजनार्थ- भूमी आशिष नाबर, दिक्षा प्रदीप काकतकर, सानिका मेस्त्री. खुला गट – प्रथम – कौस्तुभ संतोष धुरी, द्वितीय – गौरी पारकर, तृतीय – मीनाक्षी कपिल मेस्त्री, उत्तेजनार्थ – श्वेता विजय यादव, गरिमा विद्याभूषण काजरेकर, गायत्री सदाशिव आरोलकर.
सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी मालवण येथील टोपीवाला हायस्कुलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. दत्तप्रसाद खानोलकर, ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री सुजाता शेलटकर, अष्टपैलू कलानिकेतनचे अध्यक्ष भालचंद्र केळूसकर, उपाध्यक्ष सुनील परुळेकर, ऍड. दिलीप ठाकूर, संतोष शेजवलकर, सुधीर कुर्ले यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते.
