पैशांच्या वाटपाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार…

आमदार वैभव नाईक यांनी व्हिडिओसहित दाखल केली तक्रार..

⚡कणकवली ता.१५-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी 7 मे रोजी मतदान पार पडले. मात्र, या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना मतदान करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमधील मतदारांंना पैशांचे वाटप करण्यात आले. याबाबतची तक्रार लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
या संदर्भातील पुराव्यासाठी फोंडाघाट येथील भाजप कार्यकर्ता विश्वनाथ जाधव हा पैसे वाटप करतानाचा व्हिडीओ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नाईक यांनी दिला आहे. सदर व्हिडिअोत जाधव यांच्याकडून पैसे देताना हे पैसे नारायण राणे यांनी दिले आहेत, असे मतदाराला सांगण्यात आले. तरी यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्री. नाईक यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली या मतदारसंघातील ही पहिली तक्रार असल्याने याकडे आता काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.

You cannot copy content of this page