बबन साळगावकर: पैसे वाटत असताना निवडणूक आयोगाची अधिकारी पोलीस यंत्रणा काय करत होती..?
⚡सावंतवाडी ता.१५-: लोकसभा निवडणूकीत सत्ताधाऱ्यांनी पैसे वाटले हे उघड सत्य आहे, तशा प्रकारच्या व्हिडिओ देखील आता समोर येत आहेत, त्यामुळे पैसे वाटणाऱ्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केली.दरम्यान सात मे रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याची लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाने सुमारे 200 कोटी रुपये पेक्षा जास्त रुपये हे मतदारांना वाटल्याचे स्पष्ट होत आहे पैसे वाटत असताना निवडणूक आयोगाची अधिकारी पोलीस यंत्रणा काय करत होती असा सवाले श्री साळगावकर यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी साळगावकर यांनी दिलेलं प्रसिद्धी पत्रकात असे नमूद करण्यात आले की उघड उघड वही पैसे घेतले त्यांची नावे त्यांचे फोन नंबर लिहून घेतले जात होते एबीसी या प्रमाणामध्ये पैशाचे वाटप झाले आज गावागावांमध्ये शहराच्या नाक्या नाक्यावरती चर्चा होत आहे.मंत्री पक्षाचे पुढारी पैसे वाटत असल्याचे चित्र सिंधुदुर्ग जिल्हा विकासात कडे घेऊन जाण्याला मारक ठरेल,तसेच मंत्री पक्षाचे पुढारी पैसे वाटताना चे चित्र मतदारसंघांमध्ये दिसले या मतदारसं न्यायालयीन चौकशी व्हायला हवी पैसे वाटणे वरती देशद्रोहाची गुन्हे दाखल करावेत पैसे वाटणारे एक दिवस देश विकतील अशा देशद्रोह्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे अशी मागणी देखील श्री साळगावकर यांनी यावेळी केली.
