स्वराज्य निष्ठा, धर्म निष्ठा आताच्या पिढीने आत्मसात करून विचारांची जपणूक करणे ही काळाची गरज…

अनंत भाटे:नट वाचनालय संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी..

⚡बांदा ता.१४-: छत्रपती संभाजी महाराज हे शूर योद्धा तर होतेच, परंतु ते उत्कृष्ट शासक व अभ्यासू होते. त्यांनी आपल्या अल्प कारकिर्दीत स्वराज्याचा दहापटीने विस्तार केला होता. त्यांची स्वराज्य निष्ठा, धर्म निष्ठा आताच्या पिढीने आत्मसात करून त्यांच्या विचारांची जपणूक करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत अनंत भाटे यांनी येथे केले.

येथील नट वाचनालय संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री भाटे बोलत होते. यावेळी नट वाचनालयचे अध्यक्ष एस. आर सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, अंकुश माजगावकर, संचालक जगन्नाथ सातोसकर, सुधीर साटेलकर, भूषण सावंत, यश माधव, सीताकांत नाईक, स्वप्नीता सावंत, प्रमिला नाईक, सुनील नातू, अमिता परब, ओंकार धुरी, नैतिक मोरजकर, निशांत मोरजकर आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी केले.

You cannot copy content of this page