⚡कणकवली ता.१२-: संजीवनी हाॅस्पिटल व अथायू मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 13 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळेत संजीवनी हाॅस्पिटल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात अॅंजिअोप्लस्टी, हाडाचे फ्रॅचर, गुडघ्याचे लिगामेंट शस्त्रक्रिया, कॅन्सर आॅपरेशन, दुर्बिणीद्वारे मुतखडा, पोस्टेट तपासणी केली जाणार आहे. याशिवाय ई.सी.जी, रक्तातील साखर तपासणी, प्रोस्टेट विशिष्ट अॅटीजन स्टेट, लघवीची धार तपासणी केली जाणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितासाठी (8928736999) या क्रमांकावर संपर्क करावा.
संजीवनी हाॅस्पिटलमध्ये उद्या आरोग्य तपासणी शिबीर
