चोरीप्रकरणी दोन महिलांना न्या. कोठडी…

⚡कणकवली ता.१२-: खारेपाटण चोरीप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या तुलसी सतीश बडगुजर (30) व शोभा लालासिंग चव्हाण (54, दोघे रा. हडपसर, पुणे) यांची कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी रविवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


खारेपाटण-बाजारपेठेतील एका हार्डवेअरच्या दुकानात कॅरेट खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन महिलांनी दुकानाच्या काऊंटरखाली लॅपटाॅपच्या बॅगेत ठेवलेली 88,400 रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी स्नेहा सर्पे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तळेरे येथून दोन संशियत महिलांना अटक केली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशी त्या महिलांनी चोरी केल्याची कबुली दिली होती. चोरीप्रकरणी गुरुवारी तुलसी व शोभा यांना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

You cannot copy content of this page