हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात सोडावे…

प्रशासनाकडे दिगंबर वालावलकर यांची मागणी..

⚡कणकवली ता.०५-: तीव्र उन्हाळ्यामुळे जानवली नदीपात्र कोरडे पडले आहे. परिणामी नदी लगत असलेल्या गावांच्या नळ योजना पूर्णतः बंद झाल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील विहिरी देखील कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे या गावांमधील नागारिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे हकुळ धरणाचे पाणी जानवली नदीत सोडण्यात यावे, अशी मागणी तहलीदार दीक्षांत देशपांडे व संबंधित अधिकार्‍यांकडे साकेडी गावाचे ग्रा. पं. सदस्य दिगंबर वालावलकर यांनी केली आहे.


उन्हाळ्यामुळे जानवली नदीपात्र कोरडे पडले असून या नदीलगत असलेल्या गावांमधील विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होईपर्यंत गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात सोडण्यात यावे. याशिवाय कुर्ली घोणसरी धरणाच्या कालव्याचे काम व करंजे साठवण तवालाचे काम जदल गतीने करावे, अशी मागणी वालावलकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page