६ लाख ११ हजाराचा मुद्देमाल जप्त: गुन्हा दाखल..
⚡आंबोली,ता.०६-: फळांच्या वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीतून क्रेट च्या आतमध्ये लपवून वाहतूक करणारी गाडी रविवारी रात्री आंबोली पोलिसांनी पकडली.यात १लाखाच्या दारू सह गाडी जप्त करण्यात आली.६ लाख ११ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.दारुवाहतुक प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला.ही कारवाईपोलीस निरीक्षक दीपक नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्ता देसाई, दीपक शिंदे,मनीष शिंदे,अभिजित कांबळे,राजेश नाईक यांनी केली.
