कणकवली पोलिसांची कारवाई : चालकावर गुन्हा दाखल कणकवली..
⚡कणकवली ता.०५-: कणकवलीहून देवगडच्या दिशेने कारमधून होणारी गोवा बनावटीची अनधिकृत दारूवाहतूक कणकवली पोलिसांनी पाठलाग करून रोखली. पोलीस उपनिरीक्षक शरद देठे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी उत्तररात्री 12.30 वा. सुमारास येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक ते जानवली येथील हॉटेल नीलम कंट्रीसाईड या दरम्यान पाठलाग करून करण्यात आलेल्या या कारवाईत 63 हजार 360 रुपयांची दारू तसेच 7 लाख किमतीची कार असा मिळून 7 लाख 63 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कारचालक दत्तप्रसाद नंदकुमार जोईल (42, रा. तळेबाजार, देवगड) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली होती. याच दरम्यान गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या लाल रंगाची कारला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, कारााालकाने कार न थांबविता सुसाट वेगाने गोव्यााया दिशेने नेली. परिणामी संशय आल्याने पीएसआय देठे व पोलिसांनी काराचा पाठलाग केला. जानवली येथील हॉटेल नीलम कंट्रीसाईड येथे पोलिसांना कार रोखण्यात यश आले. कारची तपासणी केली करता डिकी व मागील सीटवर गोवा दारूाया बाटल्यांनी भरलेले बॉक्स आढळून आले.
पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये देठे यांच्यासह हवालदार मिलिंद देसाई, विनोद चव्हाण, पोलीस नाईक विनया सावंत, कॉन्स्टेबल राजाराम पाटील, अमोल जाधव, मकरंद माने, राहुल म्हेत्रे, राहुल राऊत यांच्यासह होमगार्ड व बीएसएफाो पथक सहभागी झाले होते. फिर्याद कॉस्टेबल राहुल राऊत यांनी दिली.
