रूपेश राऊळ:स्वतःचे घर व्यवसाय वाचवण्यासाठी त्यांनी झारापत्रादेवी महामार्ग शहराबाहेरून नेला..
⚡सावंतवाडी ता.०५-: शहराचे भाग्यविधा म्हणणाऱ्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केवळ एक तासाची सभा गांधी चौकात घेण्याची वेळ आली यावरूनच शहरवासीयांना आम्ही दिलेले हा त्यांनी ऐकली हे सिद्ध होते तर नारायण राणेंच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या याच केसरकारांमुळे राणेंचा पराभव होईल अशी टीका उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केली.
श्री राऊळ यांनी आज येथील शिवसेना शाखेत पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते राजू नाईक,चंद्रकांत कासार, शैलेश गवंडळकर आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले दीपक केसरकर यांच्यामुळेच सावंतवाडी शहराचा विकास गेला आहे. केवळ स्वतःचे घर व्यवसाय वाचवण्यासाठी त्यांनी झारापत्रादेवी महामार्ग शहराबाहेरून नेला तर आज बांदा संकेश्वर महामार्ग ही स्वतःचे घर वाचवण्यासाठी शहरा बाहेरून येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मुळात हा महामार्ग आजऱ्यापर्यंत पूर्ण होत आला आहे परंतु या ठिकाणचे काम का होत नाही हे जनतेने ध्यानात आणावे. केवळ खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका करून जनता असणार नाही खासदार विनायकराव यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत परंतु केसरकर यांनी केवळ विकास कामाचे गाजरत येथील जनतेला दाखवले आहेत त्यामुळे सावंतवाडी गांधी चौकात त्यांच्यावर केवळ एका तासाची सभा घेण्याची पाळी आली. मुळात दोन दिवसांपूर्वी आम्ही शहरवासीयांना आवाहन करताना केसरकारांचा चेहरा उघडा पडला होता. आम्ही सर्वसयांना दिलेली हात त्यांनी आज ऐकल्याचे चित्र या सभेतून दिसून आले त्यामुळे ज्या नारायण राणेंच्या प्रचाराची धुरा केसरकर सांभाळतात त्याच केसरकरणांमुळे राणेचा पराभव निश्चित आहे.
