⚡वेंगुर्ला ता.०५-: आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबाचा वर्धापनदिन सोहळा रविवार दि. १२ मे रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त ८ ते १५ मे या कालावधीत मंदिरामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.८ मे रोजी सायं. ६ वा. राज्यस्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धा, दि.९ मे रोजी रात्रौ ८ वा. श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्रौ ९ वा. अभिषेक काळे (सांगली) यांचा अभंग, नाट्यगीत व भावगीतांचा ‘स्वराभिषेक‘ कार्यक्रम, दि. १० मे रोजी रात्रौ ८ वा. श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्रौ ९ वा. नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग, दि. ११ मे रोजी सकाळी ८ पासून धार्मिक विधी, रात्रौ ८ वा. श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्रौ ९ वा. कलानीलयम ढवळी फोंडा-गोवा प्रस्तुत ‘पदन्यास‘ हा भरतनाट्यम् नृत्यविष्कार, दि. १२ मे रोजी सकाळी ८ पासून धार्मिक कार्यक्रम, पूर्णाहूती, बलिदान, दुपारी १२.३० वा. महानैवेद्य, महाआरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, रात्रौ ८ वा. श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्रौ १०.३० वा. श्री देव गिरोबा नाट्य मंडळ आरोस प्रस्तुत मराठी रंगभूमीवरील अजरामर नाट्यकृती वि.वा.शिरवाडकर लिखित व प्रविण मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट‘ हे तीन अंकी नाटक, दि.१३ मे रोजी रात्रौ ८ वा. श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्रौ ९ वा. श्री रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा नाट्यप्रयोग, दि.१४ मे रोजी रात्रौ ८ वा. श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्रौ ९ वा.श्रींची इच्छा नाट्य मंडळ, तेंडोली प्रस्तुत वि.वा.शिरवाडकर लिखित ‘संगीत ययाती आणि देवयानी‘ हे संगीत तीन अंकी पौराणिक बोधप्रत नाट्यपुष्प, दि.१५ मे रोजी रात्रौ ८ वा. श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्रौ ९ वा. मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.
तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी व गांवकर मानकरी, आरवली ग्रामस्थ यांनी केले आहे.
