⚡बांदा ता.०५-: केंद्र शाळा बांदा नंबर एक मध्ये इयत्ता पाचवी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर याने एकाच दिवशी जाहीर झालेल्या विविध स्पर्धांमध्ये कौतुकास्पद कामगिरी करत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.
यामध्ये डॉट कॉम असोसिएशन आयोजित ज्ञानी मी होणार या online स्पर्धेमध्ये गुणवंत म्हणून त्याची निवड झाली .तसेच राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या चित्रकला आणि हस्ताक्षर स्पर्धा या दोन्ही स्पर्धेत त्याला दोन गोल्ड मेडल्स प्राप्त झाली. शिष्यवृत्ती परीक्षेच्या रिझल्टमध्येसुद्धा तो पात्र ठरला आहे. तसेच शालेय वार्षिक परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला .त्याच बरोबर मुंबई केंद्र आयोजित राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धेत तो संपूर्ण राज्यात पहिला आला. तसेच नीलने अभिनय केलेल्या रिल्सला सुद्धा संपूर्ण राज्यभरात प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
तसेच नुकत्याच लागलेल्या नवोदय परीक्षेच्या रिजल्ट मध्ये ,नवोदय साठी त्याची निवड झाली .यातील शैक्षणिक स्पर्धापरीक्षांसाठी वर्गशिक्षिका सौ शुभेच्छा सावंत मॅडम यांचे ,तसेच अन्य स्पर्धांसाठी आई-वडील श्री व सौ गौरी नितीन बांदेकर आणि मामा डॉक्टर उमेश सावंत यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.या विविधांगी यशामुळे विविध स्तरातून नीलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
