⚡वैभववाडी ता.०५-: खांबाळे गावातील शिवसेना उबाठा गटातील कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत अोम गणेश निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. खांबाळेतील ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसला आहे. मंगेश पवार, संकेत पवार, बाळाराम सुतार, अक्षय पवार, मुकेश पवार, किशोर सुतार, गणेश पवार, समीर पवार, राजू सुतार यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, मनोज रावराणे, उमेश पवार, माजी उपसरपंच लवू पवार, ओंकार कदम आदी उपस्थित होते.
खांबाळेतील शिवसेना उबाठााच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश…
