केसरकर खेळतायत रडीचा डाव…

रुपेश राऊळ; सभेची परवानगी असताना देखल प्रशासनावर दबाव टाकून त्या ठिकाणी लावली राणेंची सभा..

⚡सावंतवाडी ता.०५-: आमची आजच्या सभेला देखील गांधी चौकात परवानगी असताना देखील केसरकर यांनी प्रशासनावर दबाव आणून त्या ठिकाणी राणेंची सभा लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केसरकर यांचा थंड दहशतवाद हा जनतेसमोर उघड झाला आहे असा आरोप उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केला.

दरम्यान केसरकर हे एवढे कंटाळलेले आहेत की त्यांना आता रडीचे डाव खेळल्याशिवाय त्यांना जमत नाही आहे. त्यामुळे केसरकर यांना मागून वार करण्यापेक्षा आमने-सामने येऊन आमच्याशी लढावे असे आव्हान देखील श्री राऊळ यांनी यावेळी केले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

You cannot copy content of this page