शिडवणे नं १ शाळेला ग्राम पंचायतकडून ऑक्सिमिटर…

रविंद्र शेट्ये यानी दिले सँनिटायझार स्टैंड

*💫कणकवली दि.२६-:* सध्या कोविड १९ अंतर्गत शाळांमध्ये कोविड नियमावलीचे पालन केले जात आहे. थर्मल गन , ऑक्सिमीटर अशा साधनांद्वारे मुलांची प्राथमिक तपासणी करूनच मुलांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर इत्यादी बंधनकारक असल्याने मुलांना याची सवय लागावी म्हणून शिडवणे नं. १ शाळेला ग्रामपंचायत शिडवणे यांजकडून ऑक्सिमीटर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गावातील शिक्षणप्रेमी देणगीदार रविंद्र शेट्ये यांनी शाळेला दोन सॅनिटायझर स्टॅन्ड भेट दिले आहेत.  शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत देणगीदार रविंद्र शेट्ये यांनी शाळेला दोन  सॅनिटायझर स्टॅन्ड देऊन कोविड प्रतिबंधासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. त्याबद्दल त्यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आभार मानण्यात आले.   यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश रांबाडे , उपाध्यक्षा अनिता कुडतरकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल पांचाळ , मुख्याध्यापक सुनिल तांबे, शिक्षणतज्ज्ञ मनोहर कोकाटे, निलेश टक्के, रामचंद्र पाटणकर, सुप्रिया पाष्टे , सुजाता कुडतरकर आणि शुभांगी गोसावी उपस्थित होते. 

You cannot copy content of this page