राणेंच्या प्रचारार्थ नरडवेत अबीद नाईक यांच्या बैठका…

⚡कणकवली ता.०१-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी नरडवे पंचक्रोशी बैठक घेतल्या. कोकणच्या विकासासाठी राणेंना निवडून देण्याचे आवाहन नाईक यांनी मतदारांना केला. यावेळी नरडवेचे सरपंच गणपत सावंत, माजी सभापती सभापती सुरेश ढवळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य विलास गावकर, दिलीप वरणे,राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अमित केतकर,राष्ट्रवादी जिल्हा प्रतिनिधी केदार खोत, जिल्हा सचिव सतीश पाताडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page