कुंभार समाजातर्फे विशाल परब यांचा सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.०१-: कुंभारटेंम्ब, तुळस येथे कुंभार समाजातर्फे युवा नेते विशाल परब यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी श्री.परब यांनी गोरोबा काका समाज मंदिर येथे उपस्थित राहून समाज बांधवांशी संवाद साधला.

दरम्यान स्वातंत्र्य, एकता, समता व सामाजिक न्याय या संविधानिक मूल्यांचे पालन करणे देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपण देखील सामाजिक हित अबाधित राखण्यासाठी एकोप्याने राहून सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असावे, असे आवाहन ही श्री.परब यांनी यावेळी केले.

प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार,आशिष कुंभार, गणेश कुंभार, पांडुरंग कुंभार, तेजस कुंभार, दिनेश कुंभार, सचिन कुंभार, विलास कुंभार, प्रशांत कुंभार, गजानन कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page