⚡वेंगुर्ला ता.०१-: श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथे वॉटर
प्यूरीफायर चे उद्घाटन युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान प्रभारी मुख्याध्यापक संदीप तुळसकर यांच्या हस्ते विशालजी परब यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विशालजी परब त्यांचे सर्व सहकारी ,तुळस गावचे माजी सरपंच शंकरजी घारे, विजयजी रेडकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री तुळसकर सर ,श्री घोडे पाटील सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते .
येत्या काळात विद्यालयाची वाटचाल उज्वल व्हावी यासाठी विशाल जी परब यांनी विद्यालयास आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच भावी काळात कोणतीही मदत लागल्यास आवर्जून सांगावं असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. घोडे पाटील सर यांनी केले तर आभार श्री. तुळसकर सर यांनी मानले.
