उद्धव ठाकरेंच्या उपस्थित पक्षप्रवेश होणार..
⚡कणकवली ता.०१-: मनसेचा ‘राज’मार्ग सोडलेले माजी आमदार परशुराम उपरकर व त्यांचे कार्यकर्ते पुन्हा स्वगृही म्हणजे शिवसेना उबाठा गटात प्रवेश करण्यात शक्यता आहे. त्यांचा पक्षप्रवेश शुक्रवार ३ तारखेला कणकवली येथे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेत होणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पुन्हा एकादा शिवसेनेसोबत काम करण्याची संधी उपरकर यांना मिळणार आहे.
उपरकर यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून मनसेचा रस्ता धरून ‘राज’ मार्ग स्वीकारला होता. मनसेत काम करताना अंतर्गत हेवेदाव्यांमुळे त्यांची मनसेला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर गेले काही दिवस राजकारणापासून अलिप्त होते. पत्रकार परिषदांमुळे आपण सत्ताधारी पक्षात जाणार असल्याचे ते वारंवार सांगत होते. मात्र, आता ते पुन्हा स्वगृही परतरण्याची शक्यता असून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित ते शिवबंधन बांधणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
