मिलाग्रीस हायस्कूल मध्ये आयोजित समर कॅम्पचा समारोप सोहळा उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०१-: मिलाग्रीस हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या संकल्पनेतून मिलाग्रीस हायस्कूल येथे दिनांक 15 एप्रिल 2024 ते 27 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या कॅम्प दरम्यान फादर रोनाल्ड वाझ (असिस्टंट पॅरिस प्रिस्ट डॉन बॉस्को चर्च )श्री अमित भाटकर (क्रीडा शिक्षक पणदुर हायस्कूल) श्री अंकित सोनसुरकर( क्रीडा शिक्षक मदर तेरेसा स्कूल) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे प्रशालेतील शिक्षकांचे मार्गदर्शन सुद्धा विद्यार्थ्यांना लाभले. दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी या समर कॅम्पचा समारोप सोहळा संपन्न झाला .यावेळी समर कॅम्प मध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो ,कॅम्प दरम्यान मार्गदर्शन करणारे शिक्षक तसेच सहकार्य करणारे सर्व शिक्षकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी मनापासून कौतुक केले .यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो ,पर्यवेक्षिका सौ मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page