मालवण गवंडीवाडा भागात नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡मालवण ता.३०-:
मालवण शहरातील गवंडीवाडा येथील श्री राम मंदिर येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी श्रीफळ अर्पण करून बूथ क्रमांक ९५ मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरोघरी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. महायुतीतील सर्वच पक्षांनी गावा गावातील प्रचाराचा धडाका सुरू ठेवला असून नारायण राणे यांना सर्वसामान्य जनतेतून मिळणारा प्रतिसाद पाहता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून नारायण राणे हे सर्वाधिक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी यावेळी व्यक्त केला.

महायुतीच्या सर्व पक्षांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील प्रचाला जोर दिला आहे. सर्व ठिकाणी जनतेकडून राणे यांना साथ देण्याचा असल्याचा विश्वास व्यक्त होत असल्याचेही सौरभ ताम्हणकर यांनी यावेळी सांगितले. जनतेने नारायण राणे यांना विजयी करावे, असे अहवाहन यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी केले.

यावेळी सौरभ ताम्हणकर यांच्यासह भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश सावंत, शहर सरचिटणीस निशय पालेकर, माजी नगरसेविका शर्वरी पाटकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघ प्रमुख बबन शिंदे, बूथ प्रमुख दादा कोचरेकर, चित्रा हळमळकर, आरती कोडचवाडकर, अनिशा कवटणकर, राजन परुळेकर, सर्वेश येमकर, तन्मय पराडकर, अरुण जाधव, परेश वाघ, विलसन परेरा, तुषार खराडे, सागर पाटकर, आदेश कोचरेकर, समीर मुंबरकर, राजू कुबल, चेतन हळमळकर, विनय हळमळकर, बबन गांवकर, राजू मोरजकर, जीवन घुमाळ, चारुदत्त हिंदळेकर, प्रशांत गवंडी, अंजली गवंडी, दिशा पाटकर, गायत्री गवंडी, चित्रा वस्त, प्रसाद गवंडी, वेदा पाटकर, राजा पराडकर, दिवाकर जाधव, आदित्य मोर्जे, तन्मय येमकर, डिगू पाटील, विकास पांचाळ, निकिता गवंडी, बंड्या गवंडी, अमित सावंत, उमेश मेस्त्री यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page