⚡सावंतवाडी ता.३०-: कोकण रेल्वेच्या मळगाव स्थित सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या धडकेत सावंतवाडी शहरातील एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा इसम सायंकाळपासून सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात फिरत होता.
रात्री ८.४० च्या सुमारास गोवा येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोकण कन्या एक्सप्रेसची धडक त्याला बसली या धडकेत जागीच त्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस घटनास्थळी रवाना होणार आहेत.
