⚡कणकवली ता.३०-: शिरवल गावातील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली अाहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीच्यादृष्टीने धोकादायक बनला अाहे. या रस्त्याच्या कामाची निविदा काढण्यात अाली. मात्र, अद्यापही रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात अाले नाही. त्यामुळे एेन लोकसभेच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी जोपर्यंत शिरवल रस्ता डांबरीकरण करून मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने प्रचारासाठी येऊ नये, अशा अाशयाचा बॅर्नर लावला अाहे.
शिरवल गावातील मुख्य रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. ३० वर्षांपर्वी सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात अाले होते. रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मंजूर असून निविदा काढण्यात आली आहे. सदर रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा सुरु न झाल्याने ग्रामस्थांनी बॅनरच्या माध्यमातून सर्व पक्षीयांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना लक्ष वेधले होते. निवडणुकीपुरती खोटी आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसण्या पलीकडे त्यांनी काहीही केले नाही, असा आरोप ग्रामस्थांनी अाहे. शिरवलमध्ये प्रचारासाठी येण्यास प्रवेशबंदी असा फलक लावण्यात अाला असून हा फलक लक्षवेधी ठरत आहे.
