खारेपाटणमध्ये नारायण राणे यांचा प्रचार…

⚡कणकवली ता.३०-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या खारेपाटणमध्ये महायुतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रचार सुरु केला आहे.
प्रचारामध्ये शिवसेना शिंदे गटाचे कणकवली विधानसभाप्रमुख संदेश सावंत-पटेल, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुकांत वरुणकर, तालुकाप्रमुख शरद वायंगणकर, उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव, कृषी समितीचे सदस्य मंगेश ब्रह्मदांडे, खारेपाटणच्या सरपंच प्राची इस्वलकर, ग्रा. पं. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, आस्थाली पवार, माजी पं. स.सदस्या तृप्ती माळवदे, उपसरपंच महेंद्र गुरव, राजू वरुणकर, शेखर शिंदे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. खारेपाटणमधून राणेंना मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

You cannot copy content of this page